स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : ‘एक हात मदतीचा’ या उद्धेशातून माझी सैनिक विकास संघटना वडगाव शेरी खराडी या संघटनेचा चौथा वर्धापन दिवस अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्साहात पार पडला, यामध्ये प्रामुख्याने वीर पत्नी, वीर माता, तसेच माजी सैनिक, या सर्वांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला,या संघटनेच्या माध्यमातून अनेक सैनिक परिवाराच्या हिताचे उपक्रम राबवत असल्याचे या वेळेस संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन परशुराम शिंदे यांनी सांगितले तसेच एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन सैनिक परिवार कशाप्रकारे आनंदी राहील याचा विचार या संघटनेच्या माध्यमातून केला जातो.या वेळेस मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना माजी सैनिकांबद्दल बोलताना सांगितले की भारतमातेची प्रामाणिक सेवा करून सैनिक सेवा निवृत्त झालेत. परंतु सैनिक सेवा निवृत्त होऊन सुद्धा माजी सैनिक विकास संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक, धार्मिक कार्य मोठया प्रमाणावर करून समाजामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष परशुराम शिंदे, सचिव सुभेदार प्रभाकर सोनवणे,उपाध्यक्ष कॅप्टन बाबू जाधव यांच्या नेतृत्वा खाली घडत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. माजी सैनिक विकास संघटनेचे कौतुक केले आणि भविष्यात सुद्धा अशाच स्वरूपाचे कार्य आपल्या संघटनेच्या माध्यमातून घडत रहावो आणि आपली संघटना खूप मोठया नावारूपाला येवोत अशा स्वरूपाच्या शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.यावेळी उपस्थित नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे, शिरूर तालुका मित्र परिवार संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पऱ्हाड, अनिल नवले पुणे जिल्हा बीजेपी सचिव,एअर मार्शल प्रदीप बापट,कर्नल सतीश हांगे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे, ग्रुप कॅप्टन लक्ष्मण मंडलिक,ऑफिसर इन्चार्ज,ECHS, लोहेगाव पुणे, कर्नल लक्ष्मण साठे,कर्नल साहेबराव शेळके आदींनी आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.शेवट सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेत झाला.