जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत अंबड पंचायत समितीचा बेशिस्त कारभार
संतोष भवर शहर प्रतिनिधी अंबड
शासकीय कार्यालय पंचनामाभाग एक महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्थेत जिल्हास्तरावर उच्च दर्जा असलेले जिल्हा परिषद शिखर संस्था आहे.तर लोकांचा प्रत्यक्ष संबंध असणाऱ्या ग्रामपंचायत गाव पातळीवर कार्यरत असतात. या दोन्ही संस्थांमध्ये पंचायत समिती महत्त्वाचा दुवा आहे. जिल्हा परिषदेने सोपवलेले कामे पंचायत समिती मार्फत करण्यात येतात तसेच शेतीसंबंधी कामे पशुसंवर्धन व दुग्ध शाळा विकासाची कामे वने समाज कल्याणची कामे शिक्षणाची कामे सार्वजनिक आरोग्याची कामे ग्रामीण गृहनिर्माणाची कामे इत्यादी महत्त्वपूर्ण कामे पंचायत समिती मार्फत केले जातात.परंतु अंबड पंचायत समितीचा बेसिस्त कारभारामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला खेळ बसत असल्याचे चित्र दिसत आहे. आज दिनांक 2 डिसेंबररोजी बदलता महाराष्ट्र प्रतिनिधी अनिल भालेकर यांनी प्रत्यक्ष पंचायत समिती येथे जाऊन कर्मचारी विना सुने असलेले पंचायत समिती कार्यालयाचा पंचनामा केला. जालना जिल्हाधिकारी यांचे सक्त आदेश असताना अंबड पंचायत समिती मधील बहुतांश कर्मचारी सकाळी साडेदहापर्यंत कार्यालयात हजर नव्हते.शेतकरी,मजूर,महिला तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याबाबत महत्त्वपूर्ण कामकाज पंचायत समिती मधून चालत असते परंतु अंबड पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या “आवो जावो घर हमारा” या कार्यप्रणाली मुळे ग्रामीण भागाच्या विकास कामाला खिळ बसत आहे. या गंभीर बेशिस्तक कारभाराबाबत गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न घेण्यातच धन्यता मानली तर कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला असता उद्धटपणे बेजबाबदारपणे उत्तरे दिली.मग प्रश्न असा उपस्थित होतो की तालुक्यातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय असताना देखील वेळेच्या बंधनाबाबत बेशिस्त का? बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त कोणी लावायची? असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला अंबड पंचायती समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या केराच्या टोपली बाबत वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई करणे गरजेचे आहे. अंबड पंचायत समितीच्या या बेसिस्त कार्यप्रणालीमुळे ग्रामीण भागातील जनतेबरोबरच अंबड शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्रिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे


