कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज रथोत्सव यात्रा ही विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. त्यानिमित्ताने यात्रा उत्सव गेले तीन दिवसापासून सुरू आहे.त्याचा आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दहीहंडी व महाप्रसाद घेऊन शेवट करण्यात आला आहे. भक्ती शक्तीचा हा दहीहंडीचा सोहळा डोळ्याचे पाडणे फेडणारा असा आहे ग्रामीण जनतेचा सर्वात मोठा धार्मिक कार्तिक उत्सव म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत सोनाजी महाराजांचा एक आठवडाभर चालणारा महोत्सव आहे. यावर्षी 121 पोते ज्वारीच्या भाकरी व 25 क्विंटल उडदाची डाळ सोबत अंबाडीची स्वादिष्ट भाजी महाप्रसादाची येथील परंपरा कायम आहे. श्री संत सोनाजी महाराज यांनी त्यांच्या हयातीपासूनच सुरू केलेला कार्तिक पौर्णिमेपासून हा रथोत्सव सुमारे शेकडोवरच्याशी ऐतिहासिक परंपरा जपून आजही त्याच भक्ती भावाने शिस्तबद्ध रीतीने साजरा होत आहे. मनोरथाची भव्य शोभायात्रा रात्री बारा वाजता मंदिर स्थळावरून काढण्यात येऊन आज रविवारी 17 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता परत मंदिर स्थळी गावाला प्रदक्षिणा घालून परत येत असतो. झेंडूच्या फुलांनी सजविलेला हा मनोरा मोठ्या भक्ती भावाने हजारो भाविक दोरांच्या साहाय्याने ओढतात रथाचे हे दोरखंड जीवनाचे अर्थ मोक्ष काम याचा अर्थ सांगणारे आहेत. तर रथाला मोठ्या प्रमाणावर नारळाचे तोरण बांधण्याची प्राचीन परंपरा आहे मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी मनोरस मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने पुजल्या जातो परिणामी या यात्रेत नारळाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे यावर्षी रथ मंदिर स्थळी पोहोचल्यावर हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज साबळे यांचे काल्याचे किर्तन झाल्यावर दहीहंडीला सुरुवात झाली यावेळी इतर हरिभक्त परायण व वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरी कीर्तनाचा व नंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक भक्तांची एकच गर्दी असते. त्यानंतर भावी भक्तांना उडदाची डाळ भाकरी व अंबाडीची भाजी हा स्वादिष्ट महाप्रसाद वितरित केल्या जातो. श्री संत सोनाजी महाराज यांनी या प्रसादाद्वारे असाध्य बिमारी असलेल्या रुग्णांना बरे केल्याचे सांगण्यात येते. श्रीक्षेत्र सोनाळा येथे चिखली तालुक्यातील उत्तरापेठ संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर, पिंगळी, जळगाव जामोद तालुक्यातील सुलज, आसलगाव इत्यादी ठिकाणी दरवर्षी दाखल होत असतात.









