मुकेश बागडे तालुका प्रतिनिधी सावनेर
कोराडी – भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे याना त्यांच्या राहत्या गावातूनच मतदान कमी पडण्याचा अहेर मिळण्याची शक्यता असल्याचे चित्र सध्या कोराडी महादुला येथे दिसत आहे . आता पर्यंत या परिसरातील काँग्रेस मधे असलेल्या गटबाजीमुळे प्रदेश अध्यक्षाने चांगला फायदा झाला पण काल झालेल्या बाईक रेली मध्ये राजेंद्र मुळक साहेब आणि सुनिल केदार यांचे दोन्ही समर्धक जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ कंभाले आणि केदार यांचे कट्टर समर्थक आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते रत्नदीपभाऊ रंगारी एकाच गाडीवर रैली मध्ये दिसल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून या निवडणुकीत बावनकुळे यांना घरचाच अहेर भेटण्याची दाट शक्यता आहे . बावनकुळे यांच्या विरोधात काँग्रेस चे सुरेश भोयर असून त्यांना कामठी मौदा विधानसभेत विविध लहान पक्ष आणि संघटनाचे पाठबळ व खासदार बर्वे तसेच सुनील केदार यांच्या मित्रपरिवार व राजेंद्र मूळक यांच्या कार्यकर्त्याची फळी , सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रक्षमिताई बर्वे , उपाध्यक्ष कुंदाताई राऊत , महीला व बाल कल्याण सभापती लेकुरवाळे ताई, पंचायत समिती कामठी चे सभापती दिक्षा चंकापुरे हे सर्व भोयर यांच्या प्रचारात असल्यामुळे बावनकुळे यांच्या विजयला ब्रेक लागत आहे अशी चर्चा मतदार संघात सुरू झाल्याचे बावनकुळे आणि भाजपा यांना जास्त मेहनत घेताना दिसून येत आहे . त्याच प्रमाणे या परिसरात भाजपा तर्फे झालेल्या सभेत झालेल्या निळ्या दुपट्ट्याचा अपमान आंबेडकरी जनता बावनकुळे यांना हरवून घेवू असे बोलून आंबेडकरी जनता भोयर यांच्या सोबत असल्याचे चित्र दिसत आहे .