प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड
.महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराला अवघे काही दिवस उरले असताना, सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार हे लोकांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचं आव्हान करीत आहेत. नांदेड शहर परिसरात नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण अशा दोन विधानसभा क्षेत्रांचा समावेश होत असल्याकारणाने नांदेड उत्तर मधून प्रामुख्याने विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर, संगीता पाटील डक, वंचित बहुजन आघाडीचे अभियंता प्रशांत इंगोले व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार हे मागील तीस वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याकारणाने यावेळेस नांदेड उत्तर मधून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड दक्षिण मधून विद्यमान आमदार मोहन हंबर्डे, व वंचित बहुजन आघाडीचे फारूक अहमद यांच्यात प्रामुख्याने लढत होणार असून, कार्यकर्त्याचे निष्ठा, त्याचं पक्षातील काम, व पक्षाचे पारंपारिक मतदार ज्याच्या पारड्यात आपलं मत टाकतील तोच उमेदवार निवडून येईल अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे.