चिमुर च्या इतिहासात प्रथमच प्रधानमंत्री च आगमन
विनोद शर्मा
तालुका प्रतिनिधि चिमुर
राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या असुन, प्रचाराला जोरदार सुरवात झालेली आहे. त्याच प्रचाराच्या अनुषंगाने चिमूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार बंटी भांगडिया यांच्या निवडणुक प्रचारार्थ इतिहासात पहिल्यांदाच प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचे दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ ला चिमूर क्रांती भूमीत आगमन होत आहे.
निवडणुकीचा बिगुल वाजला असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार बंटी भांगडिया यांच्या विजयाची हट्रिक करण्यासाठीं देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी व इतर स्टार प्रचारकांचे चिमूर क्रांती भूमीत आगमन होत असल्याने मतदारांचा कौल महायुतीचे उमेदवार बंटी भांगडिया यांच्या बाजूने मोठया प्रमाणात मतदारांचा अधिक कौल वाढणार असल्याची मतदारांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे.
१९५० पासुन आज पर्यंत झालेले कोणतेही प्रधानमंत्री चिमूर क्रांती भूमीत निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आजतागायत आलेले नाहीत. मात्र आज चिमूर विधानसभा क्षेत्रातील व परिसरातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी चिमूर क्रांती भूमीत येणार असल्याने महायुतीच्या समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळं महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाच्या आशा पल्लवित झालेले आहेत.