संतोष भवर शहर प्रतिनिधी अंबड
ही भारतभूमी युगानुयुगे ऋषीमुनींची भूमी आहे, हे या वसुंधरेचे मोठे भाग्य आहे की येथे अनेक महापुरुषांचा जन्म झाला. श्रमण मुनिश्री विशेषसागर जी महाराजानी पं. पू. भारत गौरव गणाचार्य श्री १०८ विरागसागरजी गुरुदेवांच्या ३३ व्या आचार्य पदारोहण दिनाच्या शुभमुहूर्तावर धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना सांगितले पू. मुनीश्री पुढे म्हणाले की, या भारत भूमीत ७१ वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील तपोमाती येथील पथरिया गावात आई श्यामा यांनी एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव अरविंद होते. वयाच्या 16 व्या वर्षी अरविंद घर सोडून क्षु.दीक्षा घेतली. चार वर्षांनंतर प. पू. आचार्य श्री विमलसागर जी महाराजांकडून औरंगाबाद (महा) येथे मुनि दीक्षा घेवून त्यांचे नाव मुनीश्री १०८ विरागसागर जी महाराज ठेवले होते गुरुदेव त्यांच्या ५५ वर्षांच्या साधना काळात. २ प्रांतात पायी विहार करून धर्माची प्रभावना करुन त्यांनी सुमारे ५०० भव्य जीवाना दीक्षा दिली आणि त्यांना मोक्षमार्गावर आणले. त्यांची तपश्चर्या, साधना आणि विशेष गुण पाहुन पू. गुरुदेवांना सिद्ध क्षेत्र द्रोणागीर जी (म. प्र) मध्ये आचार्य पद देण्यात आले, आचार्य श्री हे वात्सल्या ची साक्षात मूर्ति होते, ते लौकिक कार्यांपासून दूर राहून उन्हाळ्यात (ए. सी.) कूलर किंवा हिवाळ्यात रूम हिटरचा वापर केला नाही, त्यांनी प्राकृत भाषेत अनेक ग्रंथें लिहिली आचार्य श्रींची मुनी दीक्षा महाराष्ट्र प्रांतात झाली आणि त्यांच्या साधने च फ़ळ समाधी मरण ही (महा) प्रांतात झाल. ०४ जुलै २०२४ रोजी सकाळी २.२४वा. गणाचार्य विरागसागरजी जी महाराज यांचे जालना जिल्ह्यातील देवमूर्ती गावातील अक्षय मंगल कार्यालयात ध्यानस्थ असताना उत्कृष्ट समाधीमध्ये मरण झाले. आम्हालाही त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली सकाळी श्री 1008 चंद्रप्रभू मंदिरात अभिषेक, चंद्रप्रभु त्यागी निवास येथे अभिषेक, शांतीधारा, वास्तूविधान, गणाचार्य श्री विरागसागर विधान ,पं शांतिलालजी भीमावत अकोला आणि मनोज जैन संगीतकार यांच्या सुमधुर आवाजात संपन्न झाला. यावेळी त्यागी निवासाचे उद्घाटन करून श्रीजींना कमलासनावर बसवण्यात आले आणि मुनी सेवा समितीची घोषणा केली ,झालेल्या कार्यक्रमानंतर वात्सल्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पू.मुनिश्रींच्या प्रेरणेने अंबड समाजातील सुमारे १५० भाविकानी आचार्यश्रीं च्या समाधी स्थल देवमूर्ति दर्शनासाठी जाउन तेथे प. पू आचार्यश्रींची पूजा संपन्न केली