काँग्रेस मध्ये समर्थकांसह प्रवेशयोग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप.
मनीष ढाले ग्रामीण प्रतिनिधि फुलसावंगी
फुलसावंगी: आज गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टी सोबत काम केलेले व पक्षाशी एकनिष्ठ असणारे भारतीय जनता पार्टी चे अनुसूचित जाती चे जिल्हा अध्यक्ष विजय दत्तराव पाटील यांनी आपल्या अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.भारतीय जनता पार्टीत समर्पण भावनेने काम करत असताना पक्षाने वेळोवेळी डावले,तसेच पुरेसा प्रमाणात बौद्ध समाजातून प्रतिनिधीत्व दिले नाही,पक्षाच्या कार्यक्रमात वेळोवेळी जाणुन बुजुन डावलण्यात आले.योग्य तो मानसन्मान न मिळाल्याचे सांगत विजय पाटील यांनी आपल्या अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.व आज झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षात विजय पाटील यांनी प्रवेश घेतला.या नंतर काँग्रेस विचार धारेशी प्रामाणिक राहून काम करू व साहेबराव कांबळे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.तसेच येत्या काही दिवसांत अनेक तरुण काँग्रेस चा हात हातात घेणार आहेत.फुलसावंगी येथील काँग्रेस चे नेते जानी नवाब नेते स्वप्नील नाईक भगवानराव नाईक व कॉग्रेस पक्षाचे चाणक्य युवा नेते कुणाल नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे यावेळी विजय पाटील यांनी सांगितले.त्यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेशाने पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल.तसेच दि.७ नोव्हेंबर ला फुलसावंगीत देवेंद्र फडणवीस यांची महायुती च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा होणार आहे त्यापुर्वी अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्षाचा पक्ष प्रवेश म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.फुलसावंगीच्या राजकारणात हा मोठा धक्का मानल्या जात आहे.