संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- आर्णी-केळापुर विधानसभा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार सुरू झाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचाराचे नारळ नृसिंह देवस्थान अंजी येथे फोडले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचेआदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते.याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल मानकर ,निरिक्षक क्रिष्णा रेड्डी,महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे,जेष्ठ नेते बल्लु पाटील लोणकर,डाॅ.अरविंद भुरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतजी राठोड,खरेदी विक्री संघाचे सभापती संजय इंगळे पाटील, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आशिष पाटील लोणकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव मेश्राम,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक ठाकरे, ,सतिष भोयर,किशोर दावडा, डाॅ.विजय कडू,गौतमराव चौधरी, जगदिश पंजाबी,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मोरेश्वर वातीले,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश कल्यमवार ,शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे मनोज ढगले,प्रशांत मस्के,काँग्रेसचे शहराध्यक्ष परेश कारिया,सुभाष गोडे,राजु मुनेश्वर,अनंतराव चौधरी,विनोद मुनगीनवार, प्रदिप राठोड,काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा वैजंती ठाकरे,कल्पणा काकडे,शोभा ठाकरे,स्मिता भोयर,राजु निकोडे,अरविंद चौधरी,दशरथ मोहुर्ले,राजु निकोडे,जितेंद्र जुनगरे, सुनिल हुड,मधुकर घोडाम, अमृत पेंदोर,अक्षय पवार,आशिष भोयर,अरविंद जाधव, व महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.जितेंद्र मोघे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की,अँड शिवाजीराव मोघे यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केल्यामुळे इथल्या लोक जीवणाची व समस्यांची मला संपूर्ण जाणीव आहे.माझे बालपण घाटंजी शहरात गेले असल्याने मतदारसंघातील जनतेसोबत अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहे या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विविध प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचार यासाठी सातत्याने आरोग्य मेळाव्याचे आयोजन,अनेक रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रुग्णसेवा,व्यसनमुक्ती कार्यक्रम, युवकांसाठी विविध खेळांचे आयोजन, नोकरभरती, मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन आम्ही केले.अंँड. शिवाजीराव मोघे यांच्या पाऊलावर पाऊल टाकत समाजसेवेचा वसा जितेंद्र मोघे यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारावर असलेले प्रेम उपस्थित असलेल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या फळीवरुन लक्षात येते.