कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद विधानसभेत महायुतीचे अधिकृत उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या प्रचाराचा नारळ पुसद शहरातील महाकाली संस्थान उदासी वार्ड येथे शहरातील जनतेच्या उदंड प्रतिसाद शुभारंभ करण्यात आला.भारतीय जनता पार्टी, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई परिपा लहुजी सेना आणि मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थिती मध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.महायुती सरकारने गतिमान महाराष्ट्राच्या दिशेने पाऊले टाकीत अनेक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वकांशी योजना आणल्यामुळे आणि लाडकी बहीण योजनेमुळे जनतेमध्ये महायुतीला घेऊन राज्यभर समाधानाचे वातावरण असल्याचे मत इंद्रनील नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केले. पुसद मतदारसंघां मध्ये नाईक परिवाराचे जनतेवरील आणि जनतेचे नाईक परिवारा वरील अतूट प्रेमामुळे १९५२पासून अजिंक्य असलेल्या नाईक परिवाराला ह्या वेळेस सुद्धा इंद्रनील नाईक यांच्या स्वरूपाने भरभरून प्रेम देईल, देईल असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले. या प्रचार शुभारंभास महायुती मधील सर्व घटक पक्षांचे ज्येष्ठ नेते तथा युवा सहकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .











