सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी,नांदगाव
नांदगाव : मा. निवडणूक आयोगाच्या दिनांक 15 ॴॅक्टोंबर/2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार नांदगाव विधानसभा 113 या मतदारसंघांमध्ये दि. 22ॴॅक्टोंबर 2024 रोजी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यानुसार बुधवार दि. 6 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली.सदर बैठकीमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक व खर्च निवडणूक निरीक्षक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे तसेच निपक्षपणे पार पाडणे बाबत मार्गदर्शन तसेच सूचना दिल्या मा मुख्य निवडणूक निरीक्षक श्री .मिश्रा साहेब यांनी निवडणूक आयोगाने बनवलेल्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे पालन करणे बाबत सूचना दिल्या. तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी एक खिडकी कक्षातून परवानगी घेऊनच प्रचार करावा. परवानगीशिवाय प्रचार करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. याबाबत सूचना दिल्या तसेच पोस्टर, बॅनर हे सार्वजनिक जागेत लावू नये संबंधित विभागाची परवानगी घेऊनच स्वतःच्या अथवा खाजगी जागेवर लावण्यात यावी. याबाबतचे मार्गदर्शन केले. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे मा. खर्च निरीक्षक श्री .कॅस्ट्रो जयप्रकाश टी साहेब यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार यांना खर्चाबाबत मार्गदर्शन केले .उमेदवार यांनी निवडणूक खर्चाचे बँक खाते नवीन उघडून त्याच खात्यातून खर्च करावे इतर बँक खाते वापरू नये, तसेच सदरच्या खात्याचे निवडणूक विभागाकडून तपासणी करून घ्यावी . खर्च केलेल्या देयकाचे रेकॉर्ड ठेवावे. व तपासणी वेळी सादर करावे . सदरचे खाते हे अद्यावत करण्यात यावे. मग खर्च निरीक्षक यांनी C-Vigil app वापरण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या. मा. मुख्य निवडणूक निरीक्षक व खर्च निवडणूक निरीक्षक यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. अशी माहिती नांदगाव विधानसभा 113 निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सौंदाणे तथा तहसीलदार यांनी दिली.