जलील शेख
तालुका प्रतिनिधी पाथरी
जनभावना सध्याच्या सरकारविरोधात असून अपक्ष म्हणून अर्ज भरणार. पण निवडून आल्यानंतर तुमच्या साक्षीने महा- विकास आघाडीलाच पाठिंबा देणार आहे असे प्रतिपादन हजा- रो प्रमुख कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्या कार्यकर्त्यांशी हितगुज करताना माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी केले आहे.पुढे माजी आ. दुर्राणी म्हणाले की, सामान्य माणूस, शेतकरी- कष्टकरी प्रचंड त्रासातून जात आहे. या सरकारने लोकांना जगणे नकोसे केले. विद्यमान आमदार कोणाच्याही सुखदुःखात नाही. मतदारसंघात फिरकले सुद्धा नाहीत. पाच वर्षात पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना ते सापडलेच नाहीत. शेतकऱ्यांना कर्जवाटप, नागरिकांसाठी कुठल्याही योजनांमध्ये त्यांनी हात देखील घातला नाही. निवडणूक आली की यायचे झाली की हम आपके है कौन म्हणायचं एवढंच काय ते त्यांचं काम असा आरोप यावेळी माजी आ. दुर्राणी यांनी विरोधकांवर केला.लाडकी बहीण योजना आणायची, तिकडे महागाई वाढवायची. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. खुद्द कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात रोज आत्महत्या होतात. महाराष्ट्रात रोज ८ आत्महत्या होतात. आपल्यातील सलोखा, एकोपा, व्यवहार संपवला. या माध्यमातून निवडून येण्याची त्यांची तयारी आहे. यानिमित्ताने माझा एक निर्धार असून मानवत तालुक्यात एक एक्सप्रेस कॅनॉल काढून पाण्यापासून वंचित मानवत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देणार हा संकल्प या ठिकाणी हाती घेत आहे. आपणा सर्वांनी दि.२९ रोजी माझा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी माजी आ. दुर्राणी
यांनी केले.











