सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठमोठे बदल होताना दिसत आहेत. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातही मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. बीड जिल्ह्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पाठींबा देणारे त्यांचे खंदे समर्थक राजेभाऊ फड यांनी राजकीय वर्तुळात होणारे बदल पाहून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटात जाहीर प्रवेश केला. राजेभाऊ यांच्या जाहीर प्रवेशाने परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात मोठी चर्चा झाली याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील राजेभाऊ फड यांच्या समर्थकांनी सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटात जाहीर प्रवेश केला. परळी विधानसभा मतदारसंघातील राजेभाऊ फड यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या माध्यमातून झालेली अनेक कामे मोठा जनसंपर्क पाहता गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी हा गुलदस्ता उघडण्यात आला. व परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी कन्हेरवाडी गावचे माजी सरपंच युवा उद्योजक राजेभाऊ फड यांना जाहीर करण्यात आली. राजेभाऊ फड यांच्या उमेदवारीने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे राजेभाऊ फड यांचे समर्थक आनंद साजरा करताना दिसत आहेत तर दुसरीकडे विरोधकांमध्ये तनाव वाढल्याचे मत राजेभाऊ फड यांचे समर्थक मत व्यक्त करत आहेत. राजेभाऊ फड यांच्या उमेदवारीने परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीस वेगळाच रंग चढताना दिसत आहे. जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी नेते पुढारी कार्यकर्ते विरोधक यांच्यात मोठी धांदल उडाली असून येणारा काळच ठरवेल परळी विधानसभा मतदारसंघ कोणाचा? दि. २८ ऑक्टोबर २०२४ सोमवार रोजी राजेभाऊ फड यांचा उमेदवारी अर्ज परळी वैजनाथ शहरातील तहसील कार्यालयात दाखल करण्यात येणार आहे.