शेवगाव येथील पत्रकार परिषदेत अरुण मुंडे यांनी केली घोषणा.
तेजस ढाकणे
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर ठेवून आणि कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच अपक्ष अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरून काही झालं तरी विधानसभेची निवडणूक लढवायची ही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली असून, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केले.
शेवगाव येथील हॉटेल साई पूजा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 24 रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मत मतांतर जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित बैठकीत झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे हे बोलत होते.यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब डोंगरे, नगरसेवक शब्बीर शेख, अंकुश कुसळकर, गुरुनाथ माळवदे, मयूर हुंडेकरी, परमेश्वर केदार, भूषण देशमुख, बाळासाहेब कोळगे, ज्ञानेश्वर रासनकर, किरण पाथरकर, बबन भुसारी, गोकुळ भागवत, अमोल सागडे यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.