रिपाई सावनेर कळमेश्वर विधानसभा प्रभारी इंजिनियर राहुल बागडे यांची नियुक्ती
मुकेश बागडे तालुका प्रतिनिधी सावनेर
खापरखेडा – संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुक हालचाली सुरु आहे. सावनेर कळमेश्वर विधानसभा निवडणुकीत रिपाई पक्षाची भूमिका काय राहिलं या करिता सर्वसामान्य कार्यकर्ताची बैठक काल दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवार ला सायंकाळी ७.०० वाजता वनसंपदा खापरखेडा येथे मा. भाऊसाहेब बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सावनेर पंचायत समिती चे माजी उपसभापती भीमरावजी आवळे,माजी सरपंच प्रकाश जी लांजेवार,उपसरपंच सोनू ताई बोरकर, माजी उपसरपंच अस्मिता बागडे, माजी ग्रामपंचायत सदस्या सविता नारनवरे ग्रामपंचायत सदस्य धिरज देशभ्रतार, रिपाई नेते पृथ्वीराज बागडे, राहूल बागडे,विजय गजभिये, राजेश देशभ्रतार, शरद पाटील, संजय बनसोड, भा.बौ.म.चे अध्यक्ष मनोहरजी डोंगरे, सुमेध चव्हाण, नरेश पानतावणे, संजय मोहोड, सतीश वाघमारे, अनिल धनवटे, प्रशांत पाटील, चक्रपाल पाटील, विजयजी गुजर, मिलिंदजी ढोके, राहुलजी सोमकुवर, अभयजी तुपसुंदरे, किशोर रंगारी,महिला आघाडी चा किरणताई शेंडे, अंतकला गाडेकर, मैनाबाई सोमकुवर, मिना गुडदे, प्रिया वाघमारे, ललिता डोंगरे, माया शेंडे, माया रक्षित, युवा आघाडीचे विलीन बागडे, त्रिशरन कुराडे,सुशील सोमकुवर, शुभम पानतावणे , अभिषेक शेंडे, राजकिरन शेंडे, शुभम नागदवणे , हरिदासजी गोलाईत, आदी शेकडो रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.रिपाई च्या बैठकीचे अध्यक्ष मा.भाऊसाहेब बोरकर यांनी सभेला संबोधित करताना म्हटले की माझा समाजाच्या प्रमुख म्हणून काम करत असताना मी माझा कोर कमेटी चा बहुमताशिवाय मी कोणत्याही निर्णय घेत नाहीं. जो निर्णय कोर कमेटी मध्ये बहुमताने पारित होते. त्याच निर्णयावर पक्षांचे सर्व लहान,मोठे सर्व कार्यकर्ते काम करतात.नवनियुक्त रिपाईचे प्रभारी इंजि.राहुल बागडे यांनी आपले मत व्यक्त केले की, मोठे मोठे राष्ट्रीय पक्ष बेरिजच गणित वापरून म्हणजेच युती करुन निवडणुकीला उभे राहत आहे. सावनेर कळमेश्वर विधानसभात बौद्धांची मते विजयी उमेदवारांला निर्णायक असतात.या विधानसभा निवडणुकीत रिपाई पक्षाची भूमिका विचारधारेचा तत्त्वावर अवलंबुन राहिल असे मत व्यक्त केले.


