अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी,डहाणू
डहाणू :- काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, सोबत वादली वारा आणि विजांच्या कडकडा सोबत पाऊस पडताना दिसून येत आहे, असातच ठिकठिकाणी विजा पडल्याच्या घटनाही घडताना दिसून आलेल्या आहेत, अशीच एक घटना डहाणू तालुक्यातील वेती वरोती ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वेती बुंधेपाडा या ठिकाणाच्या मनुका कमलाकर बाहोटा या आईच्या घरावरती 18/10/2024 च्या रात्री 9 वाजल्या सुमारास घरावरती वीज पडून घरातील विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याची माहिती मिळताच युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या एका सदस्यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेत पूर्ण परिस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन फाउंडेशनच्या इतर सदस्यांना संपर्क करून संबंधित घटनेची माहिती देण्यात आली.
संबंधित घटना लक्षात घेऊन युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या घटनेची माहिती सोशल मीडियाच्या द्वारे पोहोचवण्यात आली आणि जिल्ह्याच्या खेडोपाड्यातून या कुटुंबाला मदत कशी मिळवून देता येईल हे प्रयत्न करण्यात आले तसेच युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या सर्व सदस्यांनी फुल ना फुलाची पाकळी जमा करून संबंधित कुटुंबाला तात्पुरती अन्नधान्याची व्यवस्था करून देण्यात आले, तसेच संबंधित कुटुंबाची माहिती इतर ठिकाणी प्रसारित झाल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकठिकाणी तालुक्यांमधून लोकप्रतिनिधींकडून संबंधित कुटुंबाला मदत मिळण्यास मदत झाली, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. अशोक जी भोईर साहेब यांच्याकडून संबंधित कुटुंबाला धान्याची तसेच आर्थिक मदत करण्यात आली, तसेच माजी जिल्हाध्यक्ष श्रीमती वैदही वाढाण मॅडम यांच्याकडूनही धान्याची किट देण्यात आली, तसेच युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुप मार्फत संबंधित कुटुंबाच्या घरावरचे पूर्ण कौल तुटून फुटून नेस्तनाबूत झालेले होते आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे घरातील असलेले भात,धान्य तांदूळ, खराब होऊ नये हे लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपाची तारपत्री आणून घरावरती चढवून घरात पाणी येऊ नये याची व्यवस्था युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुप मार्फत करण्यात आली.