शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.20 ऑक्टो. रोजी नियमित राम रक्षाचे पठण केल्या नंतर कोणतेही संकट येणार नाही.तर आलेले संकट सहज तेने दूर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित रामरक्षाचे पठण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दररोज स्मरण करावे. आपल्या भारत देशा वर प्रेम करावे असे मोलाचे मार्गदर्शन स्वामीजींनी विद्यार्थ्यांना केले.
सेलू येथील गीता परिवाराच्या वतीने स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थि तीत समर्थ ऍग्रो इंडस्ट्रीज परिसरात सामूहिक राम रक्षा स्रोत पठण कार्यक्रमा चे आयोजन रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी सेलू शहरातील तसेच ग्रामीण भागातील शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम कथेचे संयोजक विजयकुमार बिहाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवार मराठवाडा प्रमुख लक्ष्मीकांत करवा, सचिव संगीता तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले ,
भारत माता की जय , लव्ह भारत असे म्हणावे. उपस्थित विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार, रामरक्षा व गीता पठण, रामरक्षा व श्रीमद्भगवद्गीता पठण ,उत्कृष्टपणे सादर केले आहे . त्यामुळे त्यांच्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदांचे देखील त्यांनी अभिनंदन केले. यानंतर स्वामीजींनी सेलू शहरातील अत्रे नगर परिसरात जाऊन ह.भ.प.योगेश महाराज साळेगावकर यांच्या स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल येथे भेट देऊन, तेथील विद्यार्थ्यांचे देखील स्वागत व मार्गदर्शन केले.