दिपेश पष्टे
ग्रामीण प्रतिनिधी वाडा
वाडा : एक धक्कादायक हिट अँड रनची घटना वाड्यातील कांदिवली या परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये दोन वर्षाचा चिमुकला गुरुनाथ बाळू वाघ याला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडली आहे. दोन दिवस या अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून तपास सुरू असून त्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या परिसरातून भरधाव वेगाने येणारी ही गाडी काळ्या रंगाची चार चाकी गाडी असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर वाहन चालक गाडीसह फरार झाला आहे. या घटनेचा अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.











