शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
जिंतूर तालुकाध्यक्ष अॅड. राठोड यांची भाजपला सोडचिठ्ठी.
भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.
जिंतूर : दि. 19 भाजपचे जिंतूर तालुका अध्यक्ष अॅड. विनोद राठोड यांनी शनिवारी (दि.19) भाजप जिंतूर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देवून माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.भाजप पक्षाची ध्येय धोरणे व नेतृत्वाला कंटाळून समाजहितासाठी आपण माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली या पक्षात प्रवेश केला आहे, असे मत अॅड राठोड यांनी व्यक्त केले.
यावेळी पक्षाचा रुमाल व हार घालून भांबळे यांनी राठोड यांचे पक्षात स्वागत केले. या पक्ष प्रवेशा मुळे भाजपला जिंतूर तालुक्यात मोठे खिंडार पडले असून विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांना मोठा धक्का बसणार आहे.यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना भांबळे म्हणालेे, भाजपचा आयटी सेल पर राज्यातील अनेक मतदारांची नावे विविध बुथवर खोटे कागदपत्र जसे आधार कार्डावर पत्त्यामध्ये खाडाखोड करून नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता नावे टाकत आहेत व जिंतूर-सेलू मतदारसंघातील महाविकास आघाडीचे मतदार यांचा परस्पर सहा नंबरचा फार्म भरून अनेक लोकांची नावे मतदारसंघाच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे माजी आ. भांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या शी खासदार संजय जाधव यांच्यासमवेत भेट घेऊन असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवेदन देखील दिले आहे. यापुढे देखील असा प्रकार चालूच राहिला तर जिल्हाधिकारी यांच्या दालनात लाखो मतदार घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवून विरोधकांनी असा मतदारांच्या हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करून रडीचा डाव खेळू नये तर या उलट प्रत्यक्ष निवडणु कीत निवडणूक लढवावी, असे आवाहन देखील केले. दरम्यान, यावेळी अशोकराव चोधरी, अजयराव चौधरी, विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, बाळासाहेब भांबळे, गणेशराव ईलग, शौकत लाला, गजानन कांगणे,दलमिर पठाण, संजय निकाळजे, कैलास महाराज, विजय खिस्ते, प्रवीण चव्हाण, प्रकाश काका भांबळे, शंकर गंजे, खालेक भाई, अक्कु लाला, हकीम लाला, गंगाधर तरटे, कैलास राव सांगळे, शरदराव अंभोरे, संजयराव अंभोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.