सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २९ सप्टेंबर २०२४ परळी वैजनाथ शहरातील भारतीय स्टेट बँकेने बॅंकेत गर्दी होत असल्याने आणि बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या उध्दट वागण्यामुळे शहरातील अनेक भागात भारतीय स्टेट बँकेने अधिकृत ग्राहक सेवा केंद्र नियुक्त केले असून या ग्राहक सेवा केंद्रांच्या माध्यमातून अनेक ग्राहक बॅंकेशी व्यवहार करतात. मात्र या ग्राहक सेवा केंद्रावरून सामान्य जनेतीच मोठ्या प्रमाणात लुट होताना दिसते. भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्रावरून केंद्रावरून सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणाची असा सवाल जनतेतून येत आहे. परळी वैजनाथ शहरातील मथुरा मल्टी सर्व्हिसेस या भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राचे संचालक सचिन पोखरकर यांचे १२ सप्टेंबर २०२४ अपघाती निधन झाले परंतू या ग्राहक सेवा केंद्रात १२ सप्टेंबर २०२४ पुर्वी झालेले व्यवहार अद्याप पूर्ण झालेले नाहीत सचिन पोखरकर यांच्या मृत्यूनंतर मथुरा मल्टी सर्व्हिसेसकडून लोकांनी केलेले व्यवहार पूर्ण केले नसल्याने भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. सचिन पोखरकर यांच्याहस्ते १२ सप्टेंबर २०२४ रोजी अनेक ग्राहकांनी खात्यावर जमा करण्यासाठी घेतलेल्या रक्कमा अद्याप जमा झालेल्या नाहीत याची जिम्मेदारी कोणीच घ्यायला तयार नाही त्यांचे असलेले दुकानही बंद आहे .या मुळे अनेक जन आडचणीत आले आहेत.भारतीय स्टेट बँकेचे खातेदार मिलिंद धोंडीराम वाघमारे यांनी बॅंकेच्या मुख्यव्यवस्थापकांना या प्रकरणी चौकशी केली असता त्यांचे दुकान जेंव्हा उघडेल तेंव्हा त्यांनाच विचारा असे सांगितले. अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांचा परवाना देताना आणि बॅंकेतील खातेदारांना ग्राहक सेवा केंद्रात व्यावहार करण्यासाठी सांगाऱ्या बॅंकेतील अधिकारी आणि कर्मचारी जर हात वर करत असतील तर बॅंकेतील खातेदारांनी ग्राहक सेवा केंद्राकडून होणारी नुकसान भरपाई कोणाकडून घ्यावी. अशा पध्दतीने नुकसान होत असेल तर व्यवहार करण्यासाठी बॅंकांनी अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांचे परवाने रद्द करून सर्व व्यवहार बॅंकेतच करावे त्याचबरोबर बॅंकेच्या खातेदारांचे अर्थिक नुकसान होत असेल तर याला जबाबदार कोण?असा प्रश्न निर्माण होत आहे.