सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
ओतूर दि. २७ (ता. जुन्नर )पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर (जुन्नर) येथे भौतिकशास्त्र विभागामार्फत डी. बी. टी. स्टार योजने अंतर्गत एक दिवसीय ‘एल. ई. डी. बल्ब निर्मिती कार्यशाळा’ पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे अध्यक्षतेत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवाजी भुजबळ यांनी केले. डी.बी.टी. स्टार कॉलेज योजना समन्वयक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एन. शिरसाट यांनी डी. बी. टी. स्टार योजनेविषयी थोडक्यात माहिती दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. हरिभाऊ बोराटे यांनी कार्यशाळेच्या व्याख्यात्या सौ. सोनाली राऊत व डॉ. अविनाश रोकडे यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी ऊर्जा हे व्यवसायातील खूप मोठे क्षेत्र असून यात भरपूर प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. जग तीव्र ऊर्जा संकटाकडे वाटचाल करत असताना, पर्यायी ऊर्जा संसाधने आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची बदलत्या काळानुसार सतत गरज भासत आहे, असे मत यावेळी प्राचार्यांनी व्यक्त केले. कार्यशाळेत अवियन्स सायंटिफिक, पुणेच्या फाउंडर, सौ. सोनाली राऊत यांना ‘विजेच्या बल्बचा इतिहास व कार्य’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रयोगशाळेमध्ये एल. ई. डी. बल्ब बनविण्याचे प्रात्यक्षिके देऊन विद्यार्थ्यांकडून बल्ब बनवून घेतले. तसेच डॉ. अविनाश रोकडे यांनी एल. ई. डी. बनविण्याची पद्धत, पी.सि.बी., ड्राइवर डिझाईन, सोल्डरिंग, कंपोनंन्ट फिटिंग, टेस्टिंग व रिपेरिंग, या मूलभूत संकल्पनांची माहिती दिली.
कार्यशाळेच्या समारोपाच्या वेळी डी.बी.टी. स्टार कॉलेज योजना समन्वयक, डॉ. आर. एन. शिरसाट यांनी भविष्यात पुन्हा अशा कार्यशाळा विभागामार्फत आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यशाळेस ६० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक असे एकूण यशस्वीरित्या ६० एल.ई.डी. बल्ब तयार केले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा खूपच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून काही विद्यार्थ्यांनी भविष्यात स्वतःचे एल.ई.डी. बल्बचे स्टार्टअप सुरु करण्याचा विचार मांडला. सदर एकदिवशीय कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवाजी भुजबळ, डॉ. हरिभाऊ बोराटे, डॉ. एस. के. कोळेकर, प्रा. स्नेहल डुंबरे, प्रा. स्वप्नाली साबळे, विद्या अढारी, जयसिंग डुंबरे व नवनाथ पारधी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. एस. लंगडे, प्राध्यापक डॉ. राहुल पाटील, डॉ. पवन हांडे, प्रा. महेश गंभीर, प्रा. परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हरिभाऊ बोराटे यांनी केले. तसेच, डॉ. एस. के. कोळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.


