कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद :-१६ ऑगष्ट २०२४ पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये टप्पा वाढ, शासनाच्या चुकीने ३० दिवसात तुटीची पुर्ता केलेल्या शाळंना टप्पा वाढ, पुणे स्तरावरील शाळाना अनुदान पात्र घोषित करुन वेतन मंजूर करणे आदी मागण्यांसाठी हुंकार आंदोलन सुरु केले आहे. शासनाकडे वारंवार विनंत्ती करुनही शासन दखल घेण्यास तयार नाही. सदरील शाळंना गुरुवार पर्यत शासनाने न्याय द्यावा. अन्यथा येत्या शुकरवारी दि.२७ सप्टेबर २०२४ रोजी सबंघ महाराष्ट्र राज्यातील शाळा, कनिष्ठ विद्यालये एक दिवसाचा शैक्षणिक बंद पुकारण्यात येत. सदरील शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुंबई येथील शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सदरील दिवसाचे विद्याथ्यांचे होणारे शीक्षणिक नुकसान पुढे एक दिवस अतिरिक्त कार्यमार करत भरुन काढण्यात येईल.सदरील माहितीस्तव सादर पुसद तालुकायात मा गटशिक्षणाधिकारी यांना सर्व शिक्षकांनी अनुदाना व बंद संदर्भात निवेदन दिले आणि सर्वांनी चर्चेअंति सर्वांनी मुंबई ला आंदोलत सहभागी व्हावे मंगळवारी कॅबिनेट होण्याची दाट शक्यता आहे मंगळवार आधी सर्वांनी मुंबई आझाद मैदान गाठावे असे आवाहन सुद्धा सर्व प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना पुसद मुख्य समन्वक गोपाल चव्हाण यांनी केले निवेदन देण्याकरिता पुसद तालुक्यातील महेंद्र विंचूरकर सर, संजय राठोड सर, विवेक बैस्कर सर, काटेकर सर, जतकर सर, श्रीकांत पांडे सर,परतवार सर,लेंढे सर, संतोष पवार सर, खान सर, संजय जाधव सर,राठोड सर घाटोळी मुख्याध्यापक, डोंगरे सर, विनोद चव्हाण, साखरे, अमोल कांबळे सर, भूषण सावळे सर, सोनट्टके सर आणि कु जाधव मॅडम आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते


