तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक शहरात ईद – ए – मिलाद सणाचे औचित्य साधून पालघर पोलिसांनी हेल्मेट वाटप करून सण साजरा केला. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून नव्याने सुरू झालेला वाहतूक शाखे मार्फत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर चे संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जनजागृती अभियान अंतर्गत “रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम “राबविण्यात येत असून त्या अंतर्गत ईद – ए – मिलाद या मुस्लिम साचे औचित्य साधून हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ईस्लामिक धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर जयंती साजरी केली जाते. ईद – ए – मिलाद पवित्र सणाचे दिवशी जुलूस काढण्यात आला. सर्वत्र सुख – शांती टिकून राहावी, मानवाची सर्व त्रासापासून सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येते. संपूर्ण भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असून संपूर्ण समाजात वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दुचाकी चालकांना हेल्मेट किती महत्वाचे आहे . असा अनमोल संदेश देण्याकरिता दि. १६ /९ /२०२४ रोजी मुस्लिम बांधवांना हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले. यावेळी पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, बोईसर, तारापूर, मनोर, जव्हार व वाडा या पोलीस ठाण्याचे हद्दीत हेल्मेट वाटप करण्यात आले. मा. पोलीस अधीक्षक पालघर, मा. पोलीस उपनिरीक्षक पालघर, मा. पोलीस उपनिरीक्षक (गृह ) , पालघर यांचे हस्ते एकुण ५०० हेल्मेट भेट म्हणून वाटप करण्यात येऊन वाहतूक नियमांचे बाबत जनजागृती करण्यात आली. सदरचा कार्यक्रम श्री. बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांचे संकल्पनेतून पार पडला श्री. विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्रीमती संगीता शिंदे, पोलीस उपनिरीक्षक (गृह )पालघर, श्री. अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग श्री. विकस नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग, पोनि /शिरीष पवार, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे, पोनि /रणवीर बयेस, प्रभारी अधिकारी मनोर पोलीस ठाणे, सपोनि /निवास कणसे, प्रभारी आधिकारी तारापूर पोलीस ठाणे, उपनिरीक्षक संदीप नांगरे, तसेच पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सफौ खैरनार वाडा, यांनी सहभागी होऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.