विलास गोराडे तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, सिल्लोड, सोयगाव मतदार संघातील लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून मतदार संघात व शहर गावाचे विकास कामे करणारा उमेदवारालाच पक्षाने उमेदवारी द्यावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री ठगणराव भागवत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात व्हावा तेवढा विकास झाला नाही सिल्लोड तालुक्यात उच्च शिक्षण नाही, कोणत्या डिप्लोमा कॉलेज नाही, शैक्षणिक सुविधा नाही, शिक्षणासाठी मुंबई, पुणे, संभाजीनगर जावे लागत आहे मोठी व्यापार पेठ नाही, मोठे उद्योग धंदे नाही युवकांना रोजगाराची संधी नाही आज महिला पुरुष व युवक वर्ग इतर जिल्ह्यात मंजुरीसाठी जात आहे बेरोजगाराची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आज ही मतदारसंघाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही अनेक ठिकाणी रस्ते नाही निल्लोड गाव ते केरळा पांधी पुला अभावी नागरिक अनेक वर्षापासून परेशान झाले आहे अनेकदा स्थानिक आमदाराने आश्वासनावर आश्वासन देऊनही प्रश्न सोडविला नाही निल्लोड फाटा ते गाव रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहे ते बुजविले जात नाही मतदारसंघाची फार निराशा झाली सामान्य माणूस गल्लीबोळात फिरणारा सुखदुःखात येणारा ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका च्या इत्यादी कार्यालयात लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारा उमेदवार पाहिजे यावेळेस जर कोणालाही गुलामगिरीच्या उमेदवार नको जर डावलून उमेदवार बलांड्या धनवान यांना दिले तर परिणाम उलटे दिसून येईल कोणत्याही पक्षाने उमेदवारी देताना वस्ती गाव शहराच्या विकास कामे करणाऱ्या उमेदवार द्यावा बांधलेल्या उमेदवारामुळे विकास झाला नाही अजून असेच झाल्यास परिणाम वेगळा दिसेल असे मत श्री ठगणराव भागवत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.