लवकुमार पिंपरे ग्रामीण प्रतिनिधी सोमावल
बस स्टॅन्ड ते एम थ्री इंटरनॅशनल स्कूल पर्यंत रस्त्याचे काम झालेले आहे व पुढील रस्ता तसाच सोडून देण्यात आलेला आहे. बस स्टॅन्ड मागील एम थ्री इंटरनॅशनल स्कूल ते नेम सुशील विद्यामंदिर ते शेठ के डी हायस्कूल यांना जोडणारा एकमेव रस्ता मंजूर असून देखील, कामाला का सुरुवात झालेली नाही? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. रस्त्याची इतकी दुरावस्था झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ते शोधावे लागते. रस्त्यावरून पायी चालणे, म्हणजे अशक्यप्राय अशी गोष्ट झाली आहे.थोडा ही पाऊस आला की गटारीतले पाणी रस्त्यावर येते. हा एकच रस्ता गावाला बायपास म्हणून वापरला जातो. नंदुरबार ते तळोदा सर्व बस सुद्धा याच रस्त्याने वळविण्यात आलेली आहे, अवजड वाहनांना गावात परवानगी नसल्याने तेही याच रस्त्याने वळवण्यात आलेली आहे रस्त्यावर वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असून देखील रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे. न्यू हायस्कूल परिसर व कॉलनी परिसर ते वामनराव बापूजी मंगल कार्यालय व माळी समाज मंगल कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समिती या प्रमुख ठिकाणांना जोडणारा हा एकच रस्ता आहे. तरी पालिका प्रशासनाला कधी जाग येईल का? पालिका प्रशासन इतकं नित्रिस्त कसं?