तुकाराम पांचाळ ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
नायगाव: गजानन पाटील चव्हाण शेतकरी शेतमजुर यांचा आसूड मोर्चा धडकला तहसीला नायगाव तालुक्यातील सर्व गावतील शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस यांच्या विविध जनहितार्थ मागण्यासाठी तहशिल कार्यालयावर आसूड मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतें दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी बारा ते पाच वाजेपर्यंत डॉ हेडगेवार चौक ते तहसील या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी पुत्त्रानी आपले मनोगत व्यक्त करत असताना नायगाव मतदारसंघासह तालुक्यातील राज्यातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आलेला आहे सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरले आहे ज्या नायगाव मतदार संघातील राजकीय नेते आणि या राज्यकर्ते जातीपाती व धर्माधर्मांमध्ये सामान्य जनतेचे भांडणे लावून शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व शेतकरी सामान्य माणूस यांच्या व सर्व राजकीय झेंडे बाजूला ठेवून व जातीभेद बाजूला ठेवून शेतकरी शेतमजूर व शेतकरी पुत्रांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे घ्यावे यासाठी शेतकरी शेतमजूर समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने जनहितार्थ आसूड मोर्चा काढले आहे या मोर्चामध्ये पुढील मागण्या सरकारकडे करण्यात आले सदर मागणी १ ई पिक पाहणी नोंद रद्द,सरसकट सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा २ तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करा ३ किसान सन्मान योजना ,सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू करावी ४ शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज देताना सिविल अट रद्द करावी ५ स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला खर्चाच्या दीडपट भाव देण्यात यावा वन प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि वन्यप्राण्यामुळे शेतीचे जे नुस्कान झालेले आहे ती भरपाई तात्काळ मिळावी शेतकऱ्यांच्या अकाउंटला मारलेले होल्ड तात्काळ काढावेत,आसूड मोर्चा ची जन मागणी व मनोगत व्यक्त करताना नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व शेतकरी नेते गजानन पाटील चव्हाण, रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग पाटील शिंदे, किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर दत्ता पाटील मोरे, शेतकरी पत्र नेते श्याम पाटील वडजे, शेतकरी पुत्र बळवंत पा शिंदे, रणजित देशमुख, छावा संघटनेचे युवा अध्यक्ष राजेश मोरे, राहुल गायकवाड, शेतकरी पुत्र देविदास पा वडजे कैलास वाखर्डे किशोर महाराज धर्माबादकर, जयराम ईबितवार रावसाहेब चट्टे, बालाजी कदम, हनुमान शिंदे, शिवाजी गायकवाड, शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस मोठ्या संख्येने व सामाजिक सह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते