स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
( शिरूर ) : आज राखी पौर्णिमा आणि तिसरा श्रावणी सोमवार हा सुवर्णयोग साधून जे नातवाईक कित्येक वर्षे एकमेकांना भेटले नाहीत त्यांना एकत्र आणून आम्ही सर्वांची एक सुंदर भेट घडवून आणली.बेलापूर येथील केशव गोविंद बन येथे दर्शन आणि यात्रेचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.आपल्या आयुष्यात आपल्या जन्मासोबत काही नातलग, नातेवाईक जोडले जातात. त्या प्रत्येक नात्यात आपल्याला हवी तशी व्यक्ती असते असं नाही पण नात्यांची बांधणी पक्की असेल आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न असेल तर नात्यांची विण घट्ट होत जाते.आपण जर नाती जोपासत गेलो तर, नातं कसं विणलं जात, त्याची वीण कशी घट्ट करावी हे आपल्या कुटुंबातील मुलांना लहानपणापासून शिकायला मिळतं आणि आनंदी आयुष्य जगण्याचं जीवनकौशल्य मुले सहज आत्मसात करतात.तुम्ही पण अस काही करुन बघा किती आनंद मिळतो ते!आज मला मीच लिहिलेल्या माझ्या चार ओळी मी सार्थ केल्याचा आनंद वाटला!“ओसंडून वाही प्रेम इथे,ही गावाकडची माती,चंद्रकलेसम प्रेम फूलविती,जिव्हाळ्याची नाती!”











