18 जुलैपासून विवाह नाव नोंदणी सुरु
संतोष भरणे ग्रामीण प्रतिनीधी इंदापुर
इंदापूर- येथील सोनाई प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी १८ जुलैपासून नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील इच्छुकांनी या लग्न सोहळ्यासाठी आपले नावनोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन सोनाई प्रतिष्ठानचे प्रमुख तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण भैय्या माने यांनी केले आहे.यावेळी नव वधू वर यांना सोनाई प्रतिष्ठानकडून सोन्याचे मंगळसूत्र,संसार उपयोगी भांडी, तसेच कपडे इत्यादी भेट म्हणून देणारअसल्याचे प्रवीण माने म्हणाले.इंदापूर शहरात यापूर्वीही सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना काळात खंडित झालेली ही परंपरा सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली.आयोजित करण्यात आली आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी रामदास बनसोडे ७२४९३५१९४९, समाधान कोकाटे ८१८००००००२,अक्षय गावडे ७०५७८४३१९४ यांच्याशी संपर्क साधून नावाची नोंदणी पाच ऑगस्ट पर्यंत करण्याचे आवाहन सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.