जलील शेख तालुका प्रतिनिधी, पाथरी
लोकसभेनंतर आता सर्वांनाच विधानसभेचे वेध लागले आहे. विधानसभेसाठी इच्छुक असणारे सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहे.विधानसभेसाठी शिवसेनेतर्फे प्रबळ दावेदार असलेले शिवसेना नेते सईद खान यांनीही पाथरी विधानसभेच्या राजकीय आखाड्यात कंबर कसत मतदार संघ पिंजून काढत आहे.याच परिश्रमाची फलनिष्पत्ती म्हणून रोजच्या रोज सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरी तथा ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत.काल दि.१५ जुलै रोजी, शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालय पाथरी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या यांच्या सकारात्मक आणि विकासात्मक कार्य आणि योजनेवर विश्वास ठेवून माणिक आळसे रा.शेळगाव ता.सोनपेठ,कृष्णा हारके,पंडीत घाटुळ,उध्दव शिंदे, विष्णु शिंदे, धनंजय चव्हाण,गणेश यादव,शे.मुसाभाई इत्यादी ग्रामीण भागातील महत्त्वाच्या व्यक्तींनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात शिवसेनेला बळकटी प्राप्त होत आहे.











