कुलूपबंद घरे चोरट्यांचे टार्गेट…
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 12: शहादा येथील नेहमी वर्दळ असलेल्या गरीब नवाज कॉलनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरातून 3 लाख 72 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9 ते 10 जुलै दरम्यान शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील रहिवासी सॉफ्टवेअर इंजिनिअर शाहरुख शहागीर मन्सुरी यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील 54 हजार रुपये किमतीची 18 ग्रॅम वजनाची सोन्याची धातुची गळ्यातील पोत, 1 लाख 5 हजार रुपये किमतीची 35 ग्रॅम गळ्यातील पोत, 51 हजार रुपये किमतीची 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 75 हजार रुपये किमतीचा 25 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 30 हजार रुपये किमतीच्या 10 ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग, 21 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, 18 हजार रुपये किमतीचे 6 ग्रॅम वजनाचे कानातील काप, 12 हजार रुपये किमतीची 4 ग्रॅम वजनाची एक अंगठी, 6 हजार रुपये किमतीचे 15 तोळे चांदीची पायल असा एकुण 3 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तसेच बेडरुममधील लाकडी प्लायवूडचे कपाट तोडुन त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकुन किचन रुम मधील 3 लोखंडी पेट्यांचे कुलूप व कडी कोंडा तोडुन त्यात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले आहे. याबाबत शाहरुख मन्सुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.


