भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर आणि ९५ गावावर नांगर फिरवणा-या निम्न पैनगंगा प्रकल्पाला सध्या तरी दिलासा मिळाला आहे नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरण विरोधी संघर्ष समिती यांच्या सोबत चर्चा अंती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून धरण विरोधी संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे बैठक घडवून आणण्याचे काम कीनवट चे आमदार भीमराव केराम, केळापूर चे आमदार डॉ संदीप धुर्वे, उमरखेड चे आमदार ससाने साहेब यांनी धरण विरोधी संघर्ष समितीला मोलाचे सहकार्य केले आहे. धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यांनी धरण रद्दच करा व उच्च पातळी बंधारे बांधा अशी मागणी केली असता समेवेत असलेल्या धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी करत बैठकीत सकारात्मक विचार करुन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटबंधारे विभागाला चालू असलेली चिमटा चे काम थाबंवा व गावे न बुडवाता जल साठा कसा निर्माण करता येईल याचा अभ्यास करून आव्हाल कळवा अशा सुचना चालू बैठकीत पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. या बैठकीत उपस्थित धरण विरोधी संघर्ष समितीचे मान्यवर अॅड येरावार सर, गावंडे सर,बंडु नाईक, डॉ बाबाराव डाखोरे, विपीन राठोड,प्रकाश राठोड सह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतीभा ताई धानोरकर यांची नुकतीच सावळी सदोबा येथे सत्कार सभा झाली होती आणि त्या सभेत बोलताना त्या म्हणाल्या की मी खासदार असो किंवा नसो मी सदैव धरण विरोधी संघर्ष समिती सोबत आहे आणि सभा झाल्या नंतर त्यांनी सुध्दा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले लोकांचा विरोध असता आपण हा निम्न पैनगंगा प्रकल्प करु नये. धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख मुबारक तंवर यांनी सर्वपक्षीय आभार व्यक्त करत माकपा चे आमदार काॅर्मेड विनोद निकोले यांनी सुध्दा हा मुद्दा लावून धरला यांचे आभार मानत या प्रकल्पात कोणत्याही एका पक्षाचे बुडणार नाही तर आपण सर्वजण या प्रकल्पात बुडणार आहोत त्यामुळे हा निम्न पैनगंगा प्रकल्प राक्षेसी प्रकल्प पूर्ण हाणुन पाडावा व उच्च पातळी बंधारे बांधावे असे ठामपणे धरण विरोधी संघर्ष समिती तर्फे आपली भूमिका मांडली असुन सध्या या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धरण विरोधी संघर्ष समितीच्या बाजुने निर्णय घेतला आहे.


