मकरंद जाधव तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर रायगड जिल्ह्यातील माणगाव उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,कर्मचारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थितीत होते.उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होत आहेत.लवकरच माणगांव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.असे प्रतिपादन यावेळी अदिती तटकरे यांनी केले.











