.शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : दि.03 मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी (दि.07 जूलै) परभणीत संवाद रॅली काढण्यात येणार आहे.सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रविवार सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ‘गरजवंत मराठ्यांची संवाद रॅली’ जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालय मैदान येथून काढण्यात येणार आहे. तेथून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत येणार आहे. या रॅली दरम्यान मनोज जरांगे पाटील समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या संवाद रॅलीस मराठा समाजबांधवांनी सहकुटूंब, सह परिवार उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


