व्येकटेश चालुरकर तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली इथे नवागताचे स्वागत व नविन कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या करिता प्रथम रॅलीचे आयोजन करून नविन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर कार्यशाळेला सुरुवात करून विद्यार्थी व पालक यांच्या जागृती आणि नव्या ‘भारतीय न्याय संहिता’ विषयक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन लोनबले तर प्रमुख मार्गदर्शक अजय कोकाटे उपपोलीस विभागीय अधिकारी, अहेरी तर प्रमुख अतिथी म्हणूण दशरथ वाघमोडे (ठाणेदार) पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहेरी हे उपस्थित होते. जूने इ.स 1860 पासून चालत आलेले कायदे मोडून नविन ‘कलमाची’ व ‘कायद्याची माहिती ही जनतेस कशी हितकारक है आहे या कार्यशाळेत सांगण्यात आले.जन जागृती उद्देश घेऊन ही कार्यशाळा राबवव्यात आली. याप्रसंगी संचालन न आभार प्रदर्शन गणेश पहापळे यांनी केलेया कार्यक्रमास पालक वर्ग, शालेय कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


