परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर
पांढरकवडा : शासकीय विश्रामगृह पांढरकवडा येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाची नुकतीच बैठक पार पडली, यावेळी अधिवेशन संबधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आणि शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा कसा काढण्यात येईल या संबंधी चर्चा करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही देश पातळीवर समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघ फार कमी वेळात हवेच्या वेगाने संपूर्ण देशात पसरला गेला आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन झाल्यापासून ग्रामीण भागातील व शहरातील निर्भीड पत्रकारांचा पाया उभा करणे हे एकच ध्येय मनात ठेवून श्री गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कुठल्याही क्षेत्रातील त्यांच्या अडीअडचणी व समस्या तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार,बातमीचे वृत संकलन करत असताना अनेक अडचणींना पत्रकाराना सामोरे जावे लागते.पत्रकारांच्या समस्या सोडविणे व वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी लढा देणे हीच जिद्द ठेवून यांनी पत्रकारावरील अन्याय अत्याचार कुठेतरी थांबावा यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संपूर्ण देशात संघटन केले आहे. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय उपाध्यक्ष श्री विनोद भाऊ कनाके, जिल्हा सरचिटणीस रवीभाऊ वल्लमवार, तालुकाध्यक्ष प्रफुल नांन्ने, तालुका सचिव गणेश सामजवार , परवेज खान , तन्वीर शेख, निलेश सिडाम, आदी मान्यवर उपस्थित होते.











