अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना “घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे आणि १५जुलै पर्यंतच कागद पत्रे देण्याची मुभा दिलेली आहे .शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे , आज सोमवारला पटवारी, तलाठी सेतू तसेच झेरॉक्स दुकानावर महिला ची गर्दी झाली आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी लागणारी कागदपत्र कोणत्या तारखेपर्यंत दयाचे हे माहित नसल्यामुळे कार्यलया जवळ त्यांची तारांबळ होत आहे याचा फायदा घेत तलाठी कार्यालय मधून तलाठी हवाल साठी ५० रुपये घेत आहे तर झेरॉक्स वाले २रु कागदाचे १०रु घेत असल्याचे चित्र आहे. महिलांच्या गर्दी व आधार अपडेट्स आणि दुरुस्तीसाठी आलेले विद्यार्थी व नागरिक यांच्या गर्दीमुळे पटवारी, तलाठी व शेतू वर प्रचंड बोजा वाढला आहे. त्यातच आधार प्रणाली मंद असल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना पाच सहा वेळा आधार केंद्रावर चकरा मारावे लागत आहे.