भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – माहुर तालुक्यातील वाई बाजार येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विहाराचे बौद्ध पुर्णिमा निमित्त लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला माहुर तालुक्यातील गाव खेड्यातील बौद्ध अनुयायी हर्ष उल्लासाने उपस्थित होते त्यात प्रामुख्याने बौद्ध मुर्ती अर्पण हे विशेष उल्लेखनीय असुन डॉक्टर असुन सुद्धा समाजाला वेळ देतात कसलाही गर्व नाही शांत संयमी त्वत्वनिषठ बौद्ध उपासक डॉ झनक तातेराव मानकर यांनी सुंदर अशी बौद्ध मुर्ती पंचशील बौद्ध विहार वाई बाजार येथे अर्पण केली आहे डॉ झनक तातेराव मानकर हे मुळचे पोखरी तालुका महागाव जि. यवतमाळ येथील रहिवासी आहेत पण ब-याच दिवसांपासून वाई बाजार येथे त्यांचा दवाखाना आहे आणि बहुसंख्य लोकांचा परिचय झाला आहे त्यांचे मन येवढे रमले की ते समाजा मध्ये परीवारा प्रमाणे राहतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की आपल्या कमाईतला चौथा हीसा समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी खर्च करावा. याचे तंत्वओतंत पालन डॉ झनक तातेराव मानकर हे करत असल्याचे या बौद्ध मुर्ती रुपी अर्पण करून केले आहे तसेच मुर्तीची प्रतिष्ठापना करून भोजन दान करण्यात आले दुपारी एक वाजता पासून भोजन दान दिवसभर सुरू होते प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले वाई बाजार चे पत्रकार सुभाष खडसे यांच्या अथक परिश्रमाने पंचशील बौद्ध विहार समिती यांनी विशेष लक्ष देऊन बौद्ध पुर्णिमा निमित्त लोकार्पण सोहळा आयोजित केला होता पत्रकार बाबाराव खंदारे यांनी सुध्दा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आयोजक पंचशील बौद्ध विहार समिती, परीवर्तन वादी विचार मंच,रमाई महीला मंडळ,व समस्त गावकरी वाई बाजार यांनी पंचशील बौद्ध विहार लोकार्पण सोहळा पार पडला व डॉ झनक तातेराव मानकर यांनी समाजाला काही देणे लागते या उध्दात हेतूने बौद्ध मुर्ती अर्पण करून सत्कारमूर्ती चा बहुमान मिळाला या वेळी बौद्ध बांधवांकडून शालरुपी, पुष्पगुच्छ रुपी,शब्द रुपी, डॉ झनक तातेराव मानकर यांच्यावर संस्कारांचा वर्षाव करण्यात आला.