[ रस्ता अरुदं असल्यामुळे हा अपघात झाला अशी ओरड नागरीकात होती ]
अवधूत खडककर उमरखेड शहर प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या अंबोना तलावा जवळ उमरखेड चुरमुरा रोडवर गौशाळेजवळ वळण रस्त्यावर आईचर व मोटरसायकल यांच्या धडकेत उमरखेड जवळील रुपाळा नागापुर येथील राहुल उर्फ किरण प्रल्हाद बुरकुले वय 22 वर्ष हा जागीच ठार झाला तर शिवराज बंडू मोरे वय 19 दुर्गेश सावंत वय 21 हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सदर हे तरुण नागापुर रूपाळा येथून चुरमुरा रोडने लग्नासाठी नारळी कुरळी येथे जात असताना आयशर क्र. एम. एच. 29टी :1007 हे वाहन सुद्धा त्याच रत्याने जात असताना गौशाळे जवळच रत्यांच्या वळणावर ओव्हरटेक करीत असताना अपघात झाला सदर रोड हा अरुंद असल्यामुळे बरेच अपघात झाले हा अपघात एवढा भीषण होता की राहुल उर्फ किरण प्रल्हाद बुरकुले हा जागीच ठार झाला ही घटना सकाळी दहा वाजून 30 मिनिटाला घडली असून प्रल्हाद बुरकुले यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास पोलीस स्टेशन उमरखेड करीत आहेत.