आदेश जावळे तालुका प्रतिनिधी नेवासा
नेवासा तालुक्यातील रांजणगाव अमरधाम मध्ये कुठल्याच प्रकारची सोय नसल्याने गावातील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन वर्षांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विकास निधीतून 25 लाख रुपये खर्च करून अमरधाम शेड, कंपाऊंड वॉल, वृक्षारोपण, पाण्याची टाकी,ठिबक सिंचन ,गेट अशी कामे करण्यात आली.परतु सदर काम पुर्ण न होता ग्रामपंचायत बिल काढून मोकळी झालेली आहे. सदर अपूर्ण कामांमध्ये तिथे मैदानाची लेव्हल केलेली नाही शेड भवती आजूबाजूला मोठमोठे खड्डे आहेत तसेच त्या ठिकाणी बांधकामासाठी उरलेले दगडाचे ढीग सुद्धा तसेच पडून आहेत मुरमाचे ढिग सुद्धा त्याच अवस्थेत पडून आहेत. सध्या या अमरधाम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गवत काटेरी झुडपे काटेरी सराटे चे झाडे मोठ्या प्रमाणात आहेत . लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण झाडे जळून गेले आहेत .त्यामुळे तेथे बसण्यास नागरिकांना जागा उपलब्ध नाही. काल झालेल्या अंत्यविधी समय नागरिक पाहुणे मंडळींनी अक्षरशः रस्त्यावर उभा राहून अंत्यविधी करावा लागला हे रांजणगावचे दुर्दैव आहे. काल रात्री आठ वाजता गावातील सुसे परिवारातील एका महिलेचा अंत्यविधी झाला त्या समय त्यांना पाण्याची लाईटची अत्यंत अडचण भासली रस्त्यावरून गेट पर्यंत जाण्यासाठी अतिशय कसरत करावी लागली कारण रस्त्यात अनेक प्रकारचे काटेरी सराटे झाडे झुडपे होती. त्यावेळी अंत्यविधीसाठी आलेल्या बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींनी देखील या ठिकाणी या अमरधामचे चित्र पाहून संताप व्यक्त केला. लाईट ,पाणी,रस्ता ,आणि बसण्यास जागा नसल्याने हा विधी लवकरात लवकर उरकण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी देखील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य नेमकं करता तरी काय ?असा सवाल उपस्थित करून तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या आठ दिवसात ग्रामपंचायतीने सदर प्रश्नात लक्ष घालून लवकरात लवकर सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे . जर मागणी पूर्ण झाली नाही तर पुढील आठवड्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ज्ञानेश्वर रोडगे, बाळासाहेब गाडेकर व बाबासाहेब शिवनाथ पेहेरे यांनी दिला आहे.


