नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर, ता. १५ शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी वेगाने सरसावले असून, लग्न सराईचा एप्रिल फूल झाल्यानंतर लग्न समारंभात गुंतलेला बळीराजा आता फ्री झाला असून, आता शेती मशागतीची कामे करण्यास शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुरवात केली आहे. खरिपाची पेरणी अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या कामांसाठी लगबग वेगाने सुरू झाली असून, आता खरीप पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. तालुक्यात कोणत्याही प्रकारचा मोठा उद्योग व्यवसाय नसल्याने शेती हाच प्रमुख व्यवसाय तरुणवर्गासह बुजुर्गही हिमायतनगर: खरिपाची पेरणी अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतीचीच कामे करतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व गुरेढोरे पाळणे हा व्यवसाय या भागातील शेतकरी करतात. यावर्षी एप्रिल हा महिना अवकाळी पावसाने गाजविला. एप्रिल महिन्यात लग्नाच्या तिथी असल्याने लग्नसराई झाली आता शेतिमधे बिबियाने घेण्यासाठी लागणार्या कर्जासाठी बँकेत खेटे ■ पेरणीसाठी लागणारी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी दुकानांवर गर्दी करीत आहेत. ऐपतदार शेतकरी रासायनिक खते, बी-बियाणांची साठवणूक करीत असले, तरी जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना मात्र चाड्यावर मूठ ठेवण्यासाठी मोठी कसरत करून आर्थिक तडजोड करावी लागणार आहे. आपल्याकडील किड्डुकमिडुक मोडून पेरणीची तयारी करावी लागेल, अशी काहीशी परिस्थिती आजही अनेक शेतकऱ्यांची आहे, तर अनेक शेतकरी कर्जासाठी बँकेत खेट्या मारत आहेत, तर अनेकांना खासगी सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. खरिपाची पेरणी अगदीच म्हणजे काही आठवड्यांवर येऊन ठेपली असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असून, खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी आता सरसावला आहे. जोरदारपणे पार पडली. रोहिण्या वेळेवर आणि चांगल्या बरसल्या आणि नैसर्गिक पावसाळा मॉन्सून वेळेवर दाखल झाल्यास पेरणी करावीच लागणार आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीची तयारी करणे आता अनिवार्य ठरत आहे.