सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
अक्राणी तालुक्यातील पाणी टंचाई निमझरी, दिवडपाणी, खर्डी बुद्रुक येथे व्हेल्स ऑन व्हिल्स चे संस्थापक अध्यक्ष श्री. शहाज मेमन प्रकल्प संचालक अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने निमझरी, दिवपाणी, खर्डी बुद्रुक येथील वस्तीवर १५३ कुटुंबांना पिण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले. निमझरी,दिवडपाणी, खर्डी बुद्रुक या गावांना नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थिती पाहणी केली होती. सर्व वस्तीला एकत्र करून गावच्या समक्षा जाणून घेतल्या गावाची पाहणी करून गावातील लोकांना ड्रम वाटप करण्यात निश्चित केले. मुलींना शिक्षण घेत असताना वाया जाऊ नये. गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबाली जावी डोक्यावर होंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्था आदिवासी पाड्यावर मोफत ड्रम वाटपाचे काम करते. पाणी वाहण्यासाठी कामासाठी शाळकरी मुलींचा बराचसा वेळ जात असतो तसंच बरीचशी घराशी कामे मुलींना करावी लागतात. यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळतो नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाही ही ओळखण असून वेल्स ऑन व्हिल्स या ग्रुपच्या माध्यमातून निमझरी, दिवडपाणी, खर्डी बुद्रुक या गावांना पिण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले. वाटप वेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण भागले, प्रकल्प विजय देवरे, व्यवस्थापक, स्वप्निल पाटील, सिकंदर ब्रिडर, रोशन भंगारे, सामाजिक कार्यकर्ता प्रितेश पावरा, त्यांचे सहकार्य दीपक पावरा, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.