अमोल टेकले तालुका प्रतिनीधी मुदखेड
मुदखेड तालुक्यातील इजळी गावात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील आदर्श नामवंत महिलांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी साक्षर बनो या संकल्पनेचा निर्धार देखील करुण मोठया उत्सहात महिला दिन इजळी येथे संपन झाला आहे. मुदखेड तालुक्यातील ईजळी ग्रामपंचायत च्या वतीने सर्वात मोठा कार्यक्रम हा महिला जागतिक दिनानिमत्ताने घेण्यात आला… प्रथम मा साहेब जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर,सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली व शेकडो महिलांना ब्लाउज पिस व हार देऊन सत्कार करण्यात आला…मोदीजी नी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भुषवणाऱ्या गावच्या महिला सरपंच कविता पाटील मुंगल यांचेसह भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश पाटील मुंगल आयोजक भाजपा युती तालुकाध्यक्ष कोमल जैस्वाल, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष मुदार्जी पाटील मुंगल, भाजपा तालुका महामंत्री गोपीनाथ पाटील मुंगल, पोलीस पाटील लखन पाटील, ग्रामपंचायत सदस्य नागोराव पाटील प्रकाश हटकर, संतोष मुगल, अरुण हट- कर सत्वाशीला पांचाळ, सुंदरबाई मुंगल, संतोष पाटील, समाजसेवक प्रशांत पाटील, पदवीधर मतदार संघाचे तालुका अध्यक्ष भानेश्वर पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुंदराबाई मुंगल यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी गावातील महिला मोठया प्रमाणात उपस्थीती होत्या.