कैलास शेंडे तालुका प्रतिनिधी तळोदा
माळी समाज महिला मंडळ तळोदा यांनी दिनांक:- 9/3/2024 शनिवार रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमतः दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात उखाणे,फॅन्सी ड्रेस,सोलो व ग्रुप डान्स घेण्यात आले होते. त्यात परीक्षक म्हणून सौ.निशाताई पुराणिक, सौ.कल्याणी वडाळकर,सौ.मंदाकिनी जावरे, सौ. सुनीता शिंपी ह्या लाभले होते उखाने स्पर्धेत सौ.पूनम चंद्रकांत सूर्यवंशी-प्रथम, सौ.रत्ना संजीव महाजन-द्वितीय, सौ.पल्लवी सचिन बत्तीसे-तृतीय,सौ.चैताली परेश टवाळे- उत्तेजनार्थ,यांना बक्षीस मिळाले तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सौ.पूनम चंद्रकांत सूर्यवंशी-प्रथम, सौ.ज्योती विनोद सूर्यवंशी-द्वितीय,सौ.स्नेहल सूर्यकांत पंजराळे-तृतीय,सौ रत्ना संजीव महाजन-उत्तेजनार्थ तर सोलो व ग्रुप डान्स स्पर्धेत नारी शक्ती ग्रुप-प्रथम, योगा ग्रुप-द्वितीय, आई भवानी ग्रुप- तृतीय,सौ.चैताली परेज टवाळे- उत्तेजनार्थ,सौ.अश्विनी विशाल सूर्यवंशी-उत्तेजनार्थ अशी बक्षीस जाहीर करण्यात आले.सदर कार्यक्रमास माळी समाज महिला मंडळ अध्यक्ष सुवर्णाताई रामचंद्र राणे, उपाध्यक्ष विद्याताई नरेंद्र वाघ,सचिव सौ लीनाताई रत्नाकर शेंडे व महिला मंडळ सदस्य श्रीमती.हेमलता पिंपरे, श्रीमती.अंजना पिंपरे,सौ.अरुणा सागर, सौ.शेवंती राणे,सौ.अनिता शेंडे, सौ.भारती शेंडे,सौ.शर्मिला मगरे, श्रीमती.सुषमा सागर,सौ.वंदना सूर्यवंशी,सौ.शितल बाविस्कर,सौ. अपर्णा कर्णकार,सौ.सुमित्रा सूर्यवंशी, सौ.भारती कर्णकार,सौ.निताशा मगरे, सौ.दीपिका सूर्यवंशी,सौ.भारती टवाळे, सौ.अनिता टवाळे,सौ.सोनल मगरे,सौ. लता चव्हाण, डॉ.सौ.स्नेहल पंजराळे, सौ.वैशाली सूर्यवंशी, सौ.जोस्त्ना मगरे, सौ.ज्योती देवरे,सौ.ज्योती सूर्यवंशी,सौ.सुनिता शेंडे,सौ.भावना मगरे,सौ.ममता सोनेरी व समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रथमच माळी समाज महिला मंडळाकडून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याने भरघोस असा प्रतिसाद व आनंद महिलांमध्ये होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.हेमलताताई मधुसूदन पिंपरे व सौ.ज्योतीताई विनोद सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन माळी समाज महिला मंडळाचे सचिव सौ.लीनाताई रत्नाकर शेंडे यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











