प्रकाश कांबरे
तालुका प्रतिनिधी हातकणंगले
शिरोली दि.१९ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा शिरोली गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिरोली ग्रां.पं.वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिव जन्मकाळ सोहळा व पाळणा गायन कार्यक्रम झाला यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पाळणा गायन केले. छत्रपती राजाराम सहकार कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांनी शिवजन्म सोहळा पाळण्याचे पूजन केले. बापूसो गावडे व धनाजी पाटील यांनी राष्ट्रसेवा युवक संघटना वार्ता फलकास पुष्पहार अर्पण केले.
छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार व ग्रामपंचायत समोरील शिवमुर्तीचे सुशोभीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही अमल महाडिक यांनी दिली.
त्यावेळी उपसरपंच अविनाश कोळी,माजी उपसरपंच कृष्णात करपे वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, डॉ. सुभाष पाटील, सलीम महात,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सतीश पाटील,ग्रामपंचायत सदस्या अनिता शिंदे, कु.हर्षदा यादव,सुजाता पाटील, ग्रा.प. सदस्य श्रीकांत कांबळे,महंमद महात,विजय जाधव अरिफ सर्जेखान,महादेव सुतार,राजेश पाटील,धनाजी पाटील, उत्तम पाटील,संतोष यादव,धनाजी यादव,श्री. सयाजी काटकर,कार्तिक भोसले,श्री. धिरज पाटील त्याचबरोबर भागातील सर्व नागरिक उपस्थित होते.


