मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
छत्रपती संभाजी नगर : औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथे लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या जुगार अड्ड्यावर तोतया पोलिसांनी हात साफ केला असून. या परिसरात अनेक अवैध धंदे बोकाळले आहे. स्थानिक पोलिस प्रशासन याकडे काना डोळा करत असल्याचे दिसून येत असून. या संधीचा फायदा घेत तोतया पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर फिल्मी स्टाईलने छापा मारून अड्ड्यावर जुगाऱ्यांना बेदम मारहाण करून लाखो रुपये घेऊन पसार झाले. हि घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली असून या बाबत पोलिसांना तक्रार कशी द्यावी अशी पंचाईत जुगाऱ्याना झाली. विना क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पोलिसी थाटात आलेल्या पाच तोतया पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेदरम्यान बिडकीन परिसरात सुरू आसलेल्या जुगार अड्यावर गेले असता त्यांना बघून जुगार खेळत असलेले अनेक जुगारी पळून गेले. मात्र जागेवर सापडलेल्या काही जुगाऱ्यांना डाड्याने बेदम मारहाण करून एका खोलीत डांबून सात ते आठ लाख रुपये घेऊन तोतया पोलीस पसार झाले. गेली अनेक दिवसांपासून बिडकीन पोलिस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा मनोरा उभा राहिला असून मटका, चक्री, जुगार अड्डे जागोजागी सुरू आहेत. या अवैध धंद्यां कडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने याचा फायदा तोतया पोलीसांनी घेतला. बिडकीन परिसरात खऱ्या जुगार अड्ड्यावर खोटी धाड तोतयाच्ये हे धाडस म्हणजे प्रश्न चिन्ह ? निर्माण झाले आहे.वेळ निघून गेल्यावर आपण लुटल्या गेल्याचे जुगार्याच्या लक्षात आले.परंतु तोतया झाले शाहू खरे कोठे पाहू अशी अवस्था या जुगार्याची झाली होती











