गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई १३६ नांदुरा तालुका ग्रामसेवक युनियन तालुकाध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्यासह ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने १४ डिसेंबर २०२३ रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी १४ मार्च २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीमध्ये ऐतिहासिक संप करून सदर संपाच्या फलितार्थ जुनी पेन्शन साठी राज्य सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली. सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु विहित कालावधीमध्ये अहवाल न झाल्यामुळे मुदत वाढ देण्यात आली.मात्र सदर समितीला तीन महिन्याची मुदत देऊनही समितीने अद्याप अहवाल जाहीर केलेला नाही. सदर बाबतीत शासन वेळ काढू पणाचे धोरण अवलंबित आहे. परिणामी जुन्या पेन्शन या प्रमुख मागणीचा अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी जिल्हा परिषद तथा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. न्यायिक मागणीसाठीच्या संप व आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई . १३६ नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. तरी सर्व ग्रामसेवक युनियनचे सर्व सदस्य व कर्मचारी यांनी १४ डिसेंबर २०२३ पासून पुकारलेल्या संपाचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ सक्रिय सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ताकदीने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे सर्व सभासद संपात सहभागी झाले.( कंत्राटी ग्रामसेवक वगळून) मा पंचायत समिती प्रशासनाला विनंती आहे की. ही जुनी पेन्शन न्याय मागणी शासनापर्यंत पोहोचून संप व आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.