संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
केडगाव,ता.२९ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित १६ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या मूळगावी खानवडी ता.पुरंदर येथे पार पडले. ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, नाट्यप्रयोग असे भरगच्च कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक,लेखक,कवी आदी यावेळी उपस्थित होते.
नानगाव ता.दौंड येथील युवा पत्रकार दिपक बाजीराव पवार यांना यावर्षीच्या राज्यस्तरीय महात्मा फुले पत्रकार रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.पवार यांनी दैनिक पुण्यनगरी,दैनिक जनप्रवास,दैनिक समर्थ भारत,दैनिक केसरी,दैनिक पुणे वैभव,दैनिक नवकेसरी या अग्रगण्य वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले आहे.२०१५ साली महाराष्ट्र मिडिया या मराठी वृत्तवाहिनीत पदार्पण करत असताना आपल्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेच्या व्यथा शासन दरबारी पोहचवण्यासाठी उत्कृष्ट बातमीदारीची झलक त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे.महाराष्ट्र सोशल मिडिया दौंड तालुका अध्यक्षपदी सध्या ते कार्यरत आहे.तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनेत एकजुटीने आपले कार्य संयमी व चिकाटीने करत असतात.दिपक पवार यांना राज्यस्तरीय महात्मा फुले पत्रकार रत्न पुरस्कार संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.स्वाती शिंदे-पवार,उद्घाटक बाबाराजे जाधवराव,ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव,स्वागताध्यक्ष जगदीश उंद्रे,सुनिल लोणकर,ज्येष्ठ पत्रकार संजय सोनवणे,निमंत्रक नितीन भागवत,सुनील धिवार,भाऊ फडके यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी पवार यांचे परिसरातून कौतुक करण्यात आले.