अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी : हे गाव मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले गाव एकेकाळी मेडशी विधानसभा मतदारसंघ असलेले गाव व राजकीय सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले गाव मेडशी येथे 33 के व्ही उपकेंद्र असताना विजेच्या लाईनचा खेळ खंडोबा सुरू झाला असून यामुळे मेडशी गावातील नागरिक शेतकरी विद्यार्थी आजूबाजूच्या खेड्यातील जनता फार त्रस्त झाली असून दिवसातून 50 ते 100 वेळा विजेचा लपंडाव सुरू असतो.त्यामुळे मेडशी परिसरातील कित्येक शेतकऱ्यांना विद्युत मोटार संच निकामी झाले असून ,मेडशी येथील बळीराजाचा रब्बी हंगाम धोक्यात आला असून परिसरातील शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकाची पेरणी केली आहे.मेडशी गावातील शेतकरी नागरिक विद्यार्थी या नाहाक त्रासाला समोर जावे लागत आहे.संबंधित विद्युत वितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे व कर्मचारी हजर राहत नाही.यामुळे मेडशी गावकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता उडवाउडुची उत्तरे मिळतात असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्यामुळे मेडशी गावातील सेतू केंद्र, बँकेचे व्यवहार ठप्प होत असून सततच्या विजेच्या लपंडावामुळे मेडशी येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे संबंधित विभागाने या बाबीची गंभीर दखल घेऊन मेडशी विद्युत वितरण कार्यालय याला कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती करून मेडशी गावातील विजेचा प्रश्न मार्गी लावावा विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी वर्ग यांना आपल्या पंपाचा त्रास होऊ नये व मेडशी गावातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे मोठे नुकसान होऊ नये याकरिता मेडशी येथील राजकीय पुढार्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन संबंधित विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला ताकीद देऊन मेडशी वासीयांचा यांचा विजेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे.