अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 14 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील मंगी (सावरगांव) येथे पारवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष पोच्यारेड्डी जिद्देवार यांच्याकडे आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पारवा सर्कल, कुर्ली सर्कल मधील शेकडो कार्यकर्ते यांची दिवाळी निमित्ताने स्नेहभेट आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी घेतली. या भागातील कार्यकर्ते यांच्या सोबत विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आरोही अनिल जिद्देवार व पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास पारवेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या उपस्थितीत या दोघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन देशमुख पारवेकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या कडून पारवा विभागातील नागरीकांना शुभेच्छा देऊन पारवा सर्कल मधील विविध विकास कामावर चर्चा करण्यात आली. विज वितरण समस्या बाबत सावरगांव मंगी येथे विद्युत उपकेंद्र मंजूर करणे तसेच विज सुळरीत होण्यासाठी मागणी करण्यात आली. वन्य प्राण्यांपासून शेत पिकाचे नुकसान होत असल्याने संरक्षण भिंतीची मागणी करण्यात आली. मंगी, सावरगांव, ठाणेगांव, सावंगी (संगम), वघारा (टाकळी), सगदा, गणेरी येथे जलजीवन मिशन, दलित वस्ती, ठक्कर बापा योजनेतून विविध कामाची मागणी करण्यात आली. पार्डी जांब, किन्ही, राजापेठ, सावंगी (संगम), रामनगर येथील रस्ताची कामे मंजूर होऊन कामे झालेली नाही, या बाबत आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचेशी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी वघारा (टाकळी) येथील माजी सरपंच भगवान सकन्नवार, माजी सरपंच नितीन नार्लावर, घाटंजी पंचायत समितीचे माजी सदस्य जनार्धन उप्पुवार, गंगय्या बंडीवार, मनोज कन्नलवार, रामदास चौधरी, दत्ता मोहूर्ले, प्रशांत दोंतुलवार, गोवर्धन गड्डमवार, अशोक संकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे स्विय्य सहाय्यक दिलीप पवार या सह शेकडो कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.