संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
जि.प.प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे महिला पतंजली योग समिती कणकवली तर्फे दि.०४ ऑगस्ट २०२३ रोजी जडीबुटीदिनानिमित्त औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. डाॅ.वैशाली कोरगावकर यांनी औषधी वनस्पतींची माहिती दिली. जडी आणि बुटी यांचा संबंध स्पष्ट करताना आपल्या जीवनातील त्यांचे महत्व विशद केले. तसेच योगाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे ते सांगितले.सौ.समिधा वारंग यांनी नेहमीच्या वापरातल्या तुळस, अडुळसा,यांचे महत्त्व विशद केले आणि नियमित योग करण्याचे आवाहन केले.सौ.रश्मी आंगणे यांनी जडीबुटीदिन का साजरा करतो त्याची माहिती दिली. आपल्या परसबागेत कोरफड, अडुळसा,ब्राह्मी,तुळस,पारीजात …अशी झाडे लावा असे सांगितले. लहानपणापासूनच मुलांना वनस्पतींचे महत्त्व समजले तर अधिक चांगले. त्याचबरोबर कलमठ येथे नवीन योगकक्षा सुरू करत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व पालकांना औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. यावेळी कलमठ गावचे उपसरपंच सन्मा.श्री.स्वप्नील चिंदरकर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सन्मा.सौ.शुभांगी पवार, सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री सौ.रश्मी आंगणे, कणकवली तहसील प्रभारी सौ.समिधा वारंग,संपर्क मंत्री सौ.प्रिया कोचरेकर, सोशल मिडीया प्रभारी सौ.निता सावंत ,माजी तहसील प्रभारी डाॅ.वैशाली कोरगावकर, श्रीम.शितल गोवेकर,अंगणवाडी सेविका श्रीम.खाजणवाडकर, सर्व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रश्मी आंगणे यांनी केले.आभार सौ.प्रिया कोचरेकर यांनी मानले.











